व्हिजन

एकच ध्यास, कागल - गडहिंग्लज - उत्तूरचा सर्वांगीण विकास

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असणार्‍या श्री. समरजितसिंह घाटगे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची मुहुर्तमेढ 'श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर' या कंपनीच्या स्थापनेद्वारे रोवली गेली. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन श्री. समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत.

शिक्षणाचा जागर

चांगले शिक्षण माणसाला ओळख मिळवून देते. केवळ सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृतही बनविते. यासाठी समाजात शिक्षणाविषयी जागृती घडवून आणणे. शिक्षणाचे महत्व समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे. विशेषतः ग्रामीण भागातील कोणतेही मूल शिक्षणाशिवाय राहू नये यासाठी प्रबोधन करणे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोयी जर आपल्या गावात मिळू लागल्या तर त्यांच्यामध्ये शिक्षणाची इच्छा, उमेद निर्माण होण्यात निश्चितच मदत मिळेल. उत्तम शिक्षणाच्या सोई गावोगावी उपलब्ध करून देणे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण करणे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणार्‍या समाज घटकांना अर्थसाहाय्य करणे.

रोजगार

कोल्हापुरात विविध व्यवसायांना चालना देऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे. कोल्हापुरातील तरुणांना व महिलांना स्थानिक पातळीवर व्यवसाय व नोकरीच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने येथील एकंदर जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल.

आरोग्य सुविधा

सर्व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविणे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रुग्णालये उभारणे. उत्तम औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणे. विविध शिबिरे व उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक प्रबोधन घडवून आणणे. महिला व बालके यांच्या सुदृढ आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबविणे.



महिला सबलीकरण व उन्नतीकरण

महिला सक्षम असतील तर समाजाची प्रगती अधिक वेगाने होते. प्रत्येक महिलेने स्वयंपूर्ण व्हावे, शिकावे, नोकरी अथवा व्यवसायामार्फत स्वतःच्या पायावर उभे राहावे, प्रगती करावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. महिलांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे. महिलांचे आरोग्य व स्व-सुरक्षा याविषयी प्रशिक्षण देणे.

पर्यटन

कोल्हापूर जिल्हा व परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. देवस्थाने, ऐतिहासिक वास्तू, हवामान, चवदार खाद्यपदार्थ, वैशिष्ट्यपूर्ण शेती व अन्य उत्पादने यांमुळे दूरवरून येणारे पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित होतात. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा अधिक विकास घडवून आणणे. पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरास अव्वल स्थान मिळवून देणे.

निसर्ग संवर्धन

कोल्हापूरच्या भूमीला चांगल्या निसर्गाचे वरदान मिळाले आहे. हा निसर्ग जपणे व त्याचे संवर्धन करणे भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. कागल व कोल्हापूरचा परिसर निसर्ग समृद्ध व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवणे. जैव वैविध्य जपले जावे व त्याचे संवर्धन व्हावे यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करणे. निसर्ग आधारित पर्यटनास चालना देणे.

युवा वर्गास पाठबळ

युवा पिढी म्हणजे देशाचे भविष्य. ही पिढी सक्षम असेल तर देशाची उन्नती होईल. यासाठी युवक व युवतींना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी साहाय्य करणे. यासाठी त्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे. नोकरी, व्यवसाय व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण पुरविणे.

शेती, व्यवसाय, उद्योगांना चालना

शेती हा अनेक नागरिकांचा पारंपारिक व्यवसाय. छत्रपती शाहू महाराजांनी शेतीचे महत्व जाणून त्या काळात शेतीमध्ये अनेक नवे प्रयोग केले. हा वारसा पुढे नेत येथील शेती समृद्ध होण्यासाठी विविध उपाय करणे. शेतकर्‍यांना शेती बरोबरच शेती पूरक अन्य व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे व याद्वारे अर्थार्जनाचे नवे पर्याय उपलब्ध करून देणे. शेती व शेती पूरक व्यवसायांमार्फत तयार झालेल्या उत्पादनांसाठी बाजारपेठ व उत्तम भाव मिळवून देणे. विविध उद्योग व व्यवसायांना चालना देणे. नवनवीन व्यवसाय येथे सुरू व्हावेत यासाठी आवश्यक ती पावले उचलणे.

इतिहास

कोल्हापूरचे ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक महत्व पौराणिक काळापासून चालत आले आहे. इथली मंदिरे, ऐतिहासिक गड किल्ले व अन्य धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू आपला वेगळा छाप राखून आहेत. पौराणिक, मध्ययुगीन, शिवकालीन व छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास, त्यासंबंधित वास्तूंचे जतन करणे, हा इतिहास, हे माहात्म्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे. इतिहास व पर्यटनाची सांगड घालत त्याद्वारे रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण करणे.

जलसमृद्ध व्हावी भूमी, माती सुपीक कसदार, बहरून यावी शेती,
सदैव वाढत राहो कागल, गडहिंग्लज, उत्तूर परिसराची महती
TOP