सामाजिक कार्य

श्री. समरजितसिंह घाटगे हे एक नामांकित व्यावसायिक तर आहेतच, त्याचबरोबर जनतेसाठी अविरत झटणारा समाजकारणी ही देखील त्यांची महत्वाची ओळख आहे. नागरिकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन व त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलीत असल्याने नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष जागा आहे.

स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपले संपूर्ण जीवन कागलवासियांसाठी समर्पित केले. व्यवसायांची उभारणी करतानाही त्यांनी आपल्या सर्व संस्थांना राजर्षी शाहू महाराजांचे नाव दिले. त्यांचे जनकार्य अविरतपणे सुरू राहावे या उद्देशाने समरजितसिंह घाटगे यांनी 'राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन'ची स्थापना केली. समरजितसिंह घाटगे हे या फाऊंडेशनचे अध्यक्षपद सांभाळत असून त्यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा आहेत. समर्पित वृत्तीने काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने राजमाता जिजाऊ संस्था व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या रूपाने महिला व युवक सक्षमीकरणाची धुरा तितक्याच तोलामोलाने पेलली जात आहे.

फाऊंडेशन व समितीच्या मार्फत जनहिताची अनेक कामे केली जात आहेत. यांपैकी काही प्रमुख सामाजिक कार्यांवर एक दृष्टिक्षेप.



सांस्कृतिक कार्ये व उपक्रम

समाज, समाजातील नागरिक एकमेकांशी जोडले जातात ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून. फाऊंडेशनतर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे राबविले जात आहेत. थोर महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, कलागुणांना वाव देणार्‍या स्पर्धांचे आयोजन, विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करणे असे अनेक सांस्कृतिक उपक्रम फाऊंडेशनतर्फे घेतले जात आहेत.

शेती व जल संवर्धन

कोणत्याही नागरी भागाची प्राथमिक गरज म्हणजे पाणी. पिण्यासाठी, वापरण्यासाठी, शेतीसाठी नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी फाऊंडेशन विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे. यामध्ये उपलब्ध जलस्त्रोतांची स्वच्छता करणे, त्यांची क्षमता वाढवणे, बांध घालणे, विहिरी बांधणे अशी अनेक कामे केली जात आहेत.

कोणत्याही नागरी भागाची

आरोग्य जागृती व रुग्ण सेवा

नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण व्हावी व उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाऊंडेशनतर्फे विविध आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. यात आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आर्थिक दुर्बल घटकांना उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ दिला जात आहे.

कोणत्याही नागरी भागाची कोणत्याही नागरी भागाची

सैनिक कल्याण

आपल्या मातृभूमीचे अहोरात्र रक्षण करणार्‍या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फाऊंडेशनतर्फे आजी व माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये वीर पत्नी, वीर माता-पिता यांना आर्थिक मदत, स्नेह मेळावे, कर्ज योजना, सैनिकांच्या मुलांना शिक्षण साहाय्य असे उपक्रम घेतले जात आहेत.

कोणत्याही नागरी भागाची कोणत्याही नागरी भागाची

शिक्षण जागृती

समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शिक्षणाचे महत्व पोहोचविणे, कोणीही अशिक्षित राहू नये यासाठी जनजागृती करणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे अशी अनेक कामे फाऊंडेशनतर्फे राबविली जात आहेत. उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे, शालेय व विद्यालयीन शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रे उभारणे इ. मार्गातून शिक्षण विषयक भरघोस काम फाऊंडेशन करत आहे.

समाज कल्याण

पाणी, शिक्षण, महिला सबलीकरण, रोजगार यांसारख्या समाजोपयोगी कार्यांसह इतरही अनेक समाजकल्याणाची कामे फाऊंडेशनतर्फे केली जात आहेत. दारूबंदी, व्यसनमुक्ती, हुंडाबंदी यांविषयी समाज प्रबोधन करणे, अपघातग्रस्तांच्या वारसांना नोकर्‍या व शासकीय मदत मिळवून देण्यासाठी साहाय्य करणे, शहर व ग्राम स्वच्छता करणे तसेच ती राखण्याविषयी प्रबोधन करणे, सुशोभीकरणाची कामे व अन्य अनेक उपक्रम फाऊंडेशन नियमित रूपाने पार पाडत आहे.

जलसमृद्ध व्हावी भूमी, माती सुपीक कसदार, बहरून यावी शेती,
सदैव वाढत राहो कागल, गडहिंग्लज, उत्तूर परिसराची महती
TOP