राजमाता जिजाऊ पुण्यतिथी

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी

राजमाता जिजाऊ या अवघ्या महाराष्ट्राला वंदनीय, आदर्श माता. स्वराज्याचे स्वप्न उरी धरून त्यांनी शिवबांना घडविले. शिक्षण, न्याय, व्यवहारज्ञान, राज्यकारभार असे अनेक गुण आपल्या अपत्याच्या अंगी यावेत यासाठी त्या सतर्क राहिल्या. स्त्रीच्या खंबीर, निर्धारी रुपाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई. प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊ आदर्श आहेत. निर्धार व योग्य पाठबळ यांच्या योगे स्त्री कोणत्याही क्षेत्रात सक्षमपणे आपला ठसा उमटवू शकते. याच विचारातून व राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवून 'राजमाता जिजाऊ महिला समिती' तर्फे अनेक उपक्रम घेतले जात आहेत. स्त्रियांनी शिकावे, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे, स्वतःबरोबर आपल्या कुटुंबासही बळ द्यावे हे या समितीचे ध्येय आहे. आज, जिजाऊंच्या पुण्यतिथीच्या दिवशी या श्रेष्ठ मातेस विनम्र आदरांजली.

जलसमृद्ध व्हावी भूमी, माती सुपीक कसदार, बहरून यावी शेती,
सदैव वाढत राहो कागल, गडहिंग्लज, उत्तूर परिसराची महती
TOP