एक नजर

परिचय

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असणार्‍या श्री. समरजितसिंह घाटगे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची मुहुर्तमेढ 'श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर' या कंपनीच्या स्थापनेद्वारे रोवली गेली. श्री. समरजितसिंह घाटगे या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. समाजात सुव्यवस्था राखली जावी, समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोल्हापूरचा, महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत राज्याला प्रगतीपथावर नेणे हे त्यांचे ध्येय आहे. तसेच विकास हा सर्वसमावेशक हवा. समाजाची प्रगती साधायची असेल तर ती समाजातील सर्व घटकांना समवेत घेऊनच साधता येईल हा ठाम दृष्टिकोन व त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलण्याचे ध्येय घेऊन श्री. समरजितसिंह घाटगे कार्यरत आहेत.

शिक्षण

चांगले शिक्षण माणसाला ओळख मिळवून देते. केवळ सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृतही बनविते. यासाठी समाजात शिक्षणाविषयी जागृती घडवून आणणे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोई जर आपल्या गावात मिळू लागल्या तर त्यांच्यामध्ये शिक्षणाची इच्छा, उमेद निर्माण होण्यात निश्चितच मदत मिळेल. उत्तम शिक्षणाच्या सोई गावोगावी उपलब्ध करून देणे.

अधिक वाचा

रोजगार

कोल्हापुरात विविध व्यवसायांना चालना देऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे. कोल्हापुरातील तरुणांना व महिलांना स्थानिक पातळीवर व्यवसाय व नोकरीच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने येथील एकंदर जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल.


अधिक वाचा

पर्यटन

कोल्हापूर जिल्हा व परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. देवस्थाने, ऐतिहासिक वास्तू, हवामान, चवदार खाद्यपदार्थ, वैशिष्ट्यपूर्ण शेती व अन्य उत्पादने यांमुळे दूरवरून येणारे पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित होतात. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाचा अधिक विकास घडवून आणणे. पर्यटन क्षेत्रात कोल्हापुरास अव्वल स्थान मिळवून देणे.

अधिक वाचा
एक नजर

व्यावसायिक कारकीर्द

अभिजात वारसा शिक्षणाचा, उद्यमी परंपरेचा...
श्री. समरजितसिंह घाटगे हे पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. एक उच्चशिक्षित व यशस्वी व्यावसायिक म्हणून जनमानसात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती 'श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर' या कंपनीच्या स्थापनेद्वारे. शाहू ग्रुप कंपनीची ख्याती दिवसेंदिवस सर्वदूर पसरते आहे.


विद्यमान अध्यक्ष

श्री छत्रपती शाहू दूध आणि ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी. तसेच सन २०१५ मध्ये संचालक म्हणून निवड


माजी सभापती

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा)


अध्यक्ष, सन २०१५

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना


अध्यक्ष

शाहू कृषी सहकारी संस्था.


प्रेरक नेतृत्व

शाहू ग्रुप संचालित कागल बँक व शैक्षणिक संस्था

जोडले जा

विकासासाठी, परिवर्तनासाठी

गट-तट, जात-धर्म यांच्या पलीकडे जाऊन सकारात्मक बदल घडविण्यासाठी एकत्र या.

विकासाचा मार्ग हा तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा त्याला सर्वांची साथ मिळते. एकजुटीमध्ये मोठी ताकद असते जी संपूर्ण विकास घडवून आणते. विकासाच्या या प्रवाहात सहभागी होण्यासाठी आमच्यासह जोडले जा.

स्वयंसेवक व्हा

प्रकल्प आणि इतर घडामोडी

अधिक माहिती, नवे अपडेट्स, प्रकल्प आणि विविध घडामोडी व्हिडिओच्या माध्यमातून थेट जाणून घ्या.

सर्वसमावेशक

सामाजिक कार्य

श्री. समरजितसिंह घाटगे हे एक नामांकित व्यावसायिक तर आहेतच, त्याचबरोबर जनतेसाठी अविरत झटणारा समाजकारणी ही देखील त्यांची महत्वाची ओळख आहे. नागरिकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन व त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलीत असल्याने नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष जागा आहे. यांपैकी काही सामाजिक कार्यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप.

विचार, चिंतन

ब्लॉग्ज

लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज

श्रेष्ठ राज्यकर्ते व थोर समाजसुधारक म्हणुन समाजात सर्वत्र आदराने ज्यांचे नाव घेतले जाते ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज. केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नव्हे तर कोणत्याही काळात प्रत्येकाने आदर्श मानावे असे त्यांचे चरित्र. त्यांचा वारसा पुढे नेण्यास अत्यंत अभिमान वाटतो. केवळ अभिमान नाही तर ही एक मोठी जबाबदारी आहे याची जाणीवही सतत मनात असते.

Father's day च्या निमित्ताने

नुकतंच बाबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि पाठोपाठ दोनच दिवसात Father's day यावा हा एक योगायोग. Father's Day ही संकल्पना जरी पाश्चात्य असली, तरीही आपल्या वडिलांविषयी आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देणारा एक दिवस म्हणून याकडे पहायला निश्चितच हरकत नाही... मुलगा म्हणून त्यांनी वडिलांच्या भूमिकेतून मला जे संस्कार, जी शिकवण दिली ती तर अमूल्य आहेच,...

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी

राजमाता जिजाऊ या अवघ्या महाराष्ट्राला वंदनीय, आदर्श माता. स्वराज्याचे स्वप्न उरी धरून त्यांनी शिवबांना घडविले. शिक्षण, न्याय, व्यवहारज्ञान, राज्यकारभार असे अनेक गुण आपल्या अपत्याच्या अंगी यावेत यासाठी त्या सतर्क राहिल्या. स्त्रीच्या खंबीर, निर्धारी रुपाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाबाई. प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊ आदर्श आहेत. निर्धार व योग्य पाठबळ यांच्या योगे स्त्री कोणत्याही क्षेत्रात सक्षमपणे आपला ठसा उमटवू शकते.

सोशल मिडियावर जोडले जा

जलसमृद्ध व्हावी भूमी, माती सुपीक कसदार, बहरून यावी शेती,
सदैव वाढत राहो कागल, गडहिंग्लज, उत्तूर परिसराची महती
TOP